राज-देवेंद्र भेटीचा सुधीर मुनगंटीवार यांनी केला मोठा खुलासा!

मुंबई | राज्यातील राजकारणात गेल्या काही महिन्यात अनेक उलथापालथ पाहायला मिळाली आहे. याचदरम्यान काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांच्यात  काल बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीचा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खुलासा केला आहे.

राज्यातील बदलेली सत्तासमीकरणं पाहता कालपर्यंत शिवसेना काँग्रेससोबत जाईल असं कोणी म्हटलं तर त्याला वेडं म्हटलं असतं. पण शेवटी ते एकत्र आलेच. त्यामुळे महाराष्ट्र धर्माचा जो मूळ विचार आहे त्यावर चर्चा झाली आहे भविष्यात काहीही होऊ शकतं, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंशी भेट ही राजकीय नाही तर सदिच्छा भेट होती पण भविष्यात काहीही घडू शकतं, असंही मुनगंटीवर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर मनसेची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षासाठी मत मागण्याचं आवाहन मनसेने केलं होतं पण राज्यातील राजकीय समीकरण बदलल्याने मनसे महाअधिवेशनात काय धोरण ठरविणार हे पाहणं गरजेचं आहे.

महत्वाच्या बातम्या-