राजकीय वर्तुळात एकच चर्चा, भाजप आणि मनसेचं मनोमिलन होणार???

मुंबई | येत्या 23 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिवेशन होणार आहे. याचदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांच्यात काल बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेमुळे भाजप-मनसेची युती होणार असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सभागृहामधील परिस्थिती आपण बघत आहात. त्यामुळे भविष्यात मनसे भाजप एकत्र येऊ शकतात. सध्या जे राजकारण सुरू आहे ते तुम्ही पाहत आहात. मात्र राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये काय घडलं?, याची मला कल्पना नाही, असं वक्तव्य राजू पाटील यांनी केलं आहे.

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं, पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मनसेच्या अधिवेशनात पक्षाचा झेंडा आणि हिंदूत्वाचा मुद्दा धरून मनसे मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे. तसेच पुन्हा एक नवा ठाकरे म्हणजे अमित ठाकरे राजकारणाची माती अंगाला लावणार असल्याचं बोललं जात आहे

महत्वाच्या बातम्या-