शिवसेनेने प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही- सुधीर मुनगंटीवार

मुंबई | शिवसेनेला काँग्रेसचा पाठींबा म्हणजे 21 व्या शतकातील आश्चर्य आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाल्याप्रमाणे फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मुस्लिमांच्या सांगण्यावरुन ते सत्तेत गेले असल्याचं भाजपचे नेेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. नांदेडमध्ये ते बोलत होते.

‘देर आये दुरुस्त आये, सुबह का भुला श्याम को आया’ आम्ही असं समजू. मनसेला सोबत घ्यायची आज तरी आवश्यकता नाही. तसा प्रस्ताव देखील मनसेकडून आलेला नाही. पण समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपची भूमिका असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.

शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. आत्ताही शिवसेनेने प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे

दरम्यान, मुंबईच्या शक्तीशाली मातोश्रीचा शक्तीपात झाला आणि दिल्लीची मातोश्री शक्तिशाली झाली असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोलाही लगावला.

महत्वाच्या बातम्या-

-सरपंचाची थेट निवडणूक पद्धत रद्द; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

-“देशातील सर्व बॉम्बस्फोटांमध्ये आरएसएसचा हात आहे”

-सीएएविरोधात प्रस्ताव आणण्याचा कोणताही विचार नाही- अजित पवार

-“मोदी-शहा खुनी असल्याचे माझ्याकडे पुरावे”

-“भष्ट्राचाराच्या पैशातून मुनगंटीवारांनी 500 कोटी रुपयांचा बंगला बांधला”