सरपंचाची थेट निवडणूक पद्धत रद्द; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई |  जनतेतून होणारी सरपंच निवड अखेर ठाकरे सरकारने रद्द केली आहे. राज्य मंत्रिमंडळाची कॅबीनेट बैठक आज मंत्रालयात पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला असून बैठकीत अन्य काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

सरपंच परिषद आणि राज्यातील 9 हजार ग्रामपंचायतींनी जनतेमधूनच सरपंच निवड व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र, ठाकरे सरकारने ग्रामपंचायतींची मागणी डावलून सरपंचाची निवड थेट जनतेतून न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या या निर्यणावर टीका सुरु झाली आहे. शासनाने घेतलेला हा अतिशय दुर्दैवी निर्णय आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे पडसाद उद्यापासून महाराष्ट्रात उमटलेले दिसतील, असा इशारा सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिला आहे.

दरम्यान, तत्कालिन फडणवीस सरकारने जनतेतून सरपंच निवड व्हावी यासाठी मंत्रिमंडळात बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र, ठाकरे सरकारडून फडणवीस सरकारचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“देशातील सर्व बॉम्बस्फोटांमध्ये आरएसएसचा हात आहे”

-सीएएविरोधात प्रस्ताव आणण्याचा कोणताही विचार नाही- अजित पवार

-“मोदी-शहा खुनी असल्याचे माझ्याकडे पुरावे”

-“भष्ट्राचाराच्या पैशातून मुनगंटीवारांनी 500 कोटी रुपयांचा बंगला बांधला”

-जेव्हा नारायण मूर्ती रतन टाटांच्या पाया पडतात