शेवग्याची पानं ‘या’ रुग्णांसाठी ठरू शकतात संजीवनी; वाचा सविस्तर!

मुंबई | वृक्ष हा निसर्गातील एक अनमोल घटक आहे. वृक्षांचे अनेक फायदे आपल्याला माहीत आहेत. सामान्यपणे आढळणारा शेवगा हा आरोग्यासाठी किती लाभदायक ठरू शकतो हे आपल्याला माहित आहे का? हाच शेवगा क्षयरोगासाठी संजीवनी ठरू शकतो.

अनेक रुग्णालयांत क्षयरोगाने ग्रासलेल्या रोग्यांची गर्दी असते. अनेक रुग्ण या आजारातून बरं होण्यासाठी रुग्णालयात लाखोनं पैसे खर्च करत असतात. मात्र, सामान्यपणे मिळणाऱ्या शेवग्याच्या शेंगा आणि शेवग्याची पानं हे क्षयरोग्यांसाठी वरदान ठरू शकतात.

क्षयरोग्यांनी शेवग्याची पानं आणि शेंगा यांचा आहारात समावेश केल्यास शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण सुधरते आणि क्षयरोगाशी टक्कर देण्यास रोगी समर्थ होतो. शेवग्याच्या पानात शरीरातील फ्री रॅडीकलचा सामना करण्याची शक्ती ऑरॅक रेटिंगमध्ये खूप उच्च दर्जाची असते

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहणारे डॉ. ललितकुमार आनंदे यांनी क्षयरोग्यांसाठी शेवगा किती फायदेशीर ठरू शकतो यावर अभ्यास सुरू केला. तेव्हा शेवगा क्षयरोग्यांसाठी संजीवनीच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी शेवगा थेरपीचा प्रचार सुरू केला. या संशोधनसाठी डॉ. आनंदे यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मेंदूतील गाठीच्या शस्त्रक्रियेसाठी गेलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह

‘एका तासातच मोदींना ठार करेन’; चक्क मोदींना जीवे मारण्याची धमकी!

राज्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार नाही- युजीसी

“जे सरकार शिवरायांचा द्वेष करतं ते हिंदुत्ववादी कसं?, भाजपची नकली शिवभक्ती काय कामाची”

…म्हणून सुशांतचा जवळचा मित्र संदीप सिंग आता ईडीच्या रडारवर!