सुशांतच्या शरीरावरील ते पांढरे डाग नेमके कशाचे?; फॉरेन्सिक रिपोर्टने केला उलगडा

मुंबई | सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणातील गूढ उलगडण्यासाठी हे प्रकरण आता सीबीआयच्या हाती देण्यात आलं आहे. सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहे. अशातच आता सुशांतचे फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आले आहेत. मुंबई पोलिसांनी हे रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहेत.

कलिना फॉरेन्सिक लॅबने आपला फॉरेन्सिक अहवाल दिलेला आहे. कलिना फॉरेन्सिक लॅबमधून टेक्सिकोलॉजी, सायबर, लिचीजर मार्क, नेल सॅम्पलिंग, स्टमक वॉश हे अहवाल समोर आले आहेत. या अहवालांमध्ये सुशांतच्या मृत्यूवेळी कोणतेही वाईट कृत्य घडल्याचा प्रकार आढळून आलेला नाही.

फॉरेन्सिक रिपोर्टनुसार सुशांतच्या शरीरावर आढळलेले पांढरे डाग त्याच्या थुंकीचे आहेत. सुशांतच्या मृत्यवेळी त्याच्या तोंडातून थुंकी बाहेर आली आणि ती थुंकी शरीरावरच वाळल्यामुळे ते डाग तयार झाले आहेत. ते कोणतेही प्रकारचे स्ट्रगल मार्क नाहीत.

दरम्यान, सुशांतच्या स्टमक वॉश रिपोर्टमध्ये सुशांतला मृत्यूपूर्वी कोणतीही विषारी वस्तू किंवा विष देण्यात आलं नव्हतं हे स्पष्ट झालं आहे. त्याचप्रमाणे सुशांतच्या नेल सॅम्पलिंगमध्ये कोणत्याही प्रकारच्या झटापटीच्या खूना आढळल्या नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात, महाराज ही फक्त महाराष्ट्राची संपत्ती नाही त्यांनी नाक खुपसण्याची गरज नाही

मेंदूतील गाठीच्या शस्त्रक्रियेसाठी गेलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह

‘एका तासातच मोदींना ठार करेन’; चक्क मोदींना जीवे मारण्याची धमकी!

राज्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार नाही- युजीसी

“जे सरकार शिवरायांचा द्वेष करतं ते हिंदुत्ववादी कसं?, भाजपची नकली शिवभक्ती काय कामाची”