…आता मी 25 वर्ष तरी खासदारकीची खुर्ची सोडणार नाही- सुजय विखे

अहमदनगर : विखे परिवाराला संपवायला निघालेले आता स्वत: संपून गेले आहेत. त्यामुळे मी आता 25 वर्ष तरी खुर्ची सोडणार नाही, असं भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्यात भाजप-शिवसेना युती सरकारने मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत. मात्र याआधी 15 वर्ष सत्तेत असणाऱ्यांना साकळाई योजनेचा प्रश्न मार्गी लावता आला नाही, अशी टीका सुजय विखे यांनी केली आहे.

साकळाईबाबत शंका ठेवू नका. साकळाई फक्त विखेच करू शकतात. साकळाई झाली नाही, तर पुन्हा मतं मागायला येणार नाही, असं सुजय विखे म्हणाले आहेत.

नगर तालुक्यात तीन आमदार आहेत, पण तालुक्याकडे कोणी लक्ष देत नाही. काम घेऊन गेलेल्यांना अपमानास्पद वागणूक मिळते. आता तुमच्या सगळ्या कामांची जबाबदारी माझ्यावर आहे. मीच तुमचा आमदार आणि खासदार आहे, असं सुजय विखेंनी म्हटलं.

दरम्यान, विखे परिवाराला संपवण्यासाठी निघालेल्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यांच्याकडे आता निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारच शिल्लक नाही, असा टोलाही सुजय विखेंनी राष्ट्रवादीला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-