भाजपला आज दिलासा… उद्या कसोटी!

नवी दिल्ली | महाराष्ट्र सत्तास्थापनेच्यासंबंधी सगळ्या देशाचं ज्या सुप्रिम कोर्टाकडे लक्ष लागलं होतं त्या सुप्रिम कोर्टाने आजचा निर्णय उद्यावर ढकलला आहे. महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर उद्या पुन्हा सकाळी साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे.

राज्यपालांनी कोणत्या आधारावर सरकार स्थापनेची भाजपला परवानगी दिली ते कागदपत्रं न्यायालयात सादर करण्याचे कोर्टाने तुषार मेहता यांना आदेश दिले आहेत. तर सगळ्या पक्षकारांना न्यायालयाने नोटीस जारी केली आहे.

अधिवेशन बोलावून विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडाला जावा आणि भाजपला आजच बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी कपील सिब्बल यांनी लावून धरली होती. तर अजित पवार यांनी दिलेलं भाजपला दिलेलं पत्र चुकीचं आहे. जास्त वेळ बहुमत सिद्ध करण्यासाठी दिल्यास फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता आहे. उद्याच बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी  अभिषेक मनु सिंघवी यांनी केली होती. तर राज्यपालांना कोणतंही कोर्ट आदेश देऊ शकत नाही, तीन आठवडे विरोधक कुठे होते? विरोधकांची याचिका फेटाळून लावावा, असा युक्तीवाद सरकारच्यावतीने मुकुल रोहतगी यांनी मांडली.

दरम्यान, दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने राज्यपालांनी कोणत्या आधारावर सरकार स्थापनेची भाजपला परवानगी दिली ते कागदपत्रं न्यायालयात सादर करण्याचे आदेश उद्या सकाळी साडे 10 वाजपर्यंत कोर्टाने तुषार मेहता यांना दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-