मराठा आरक्षण प्रकरणी महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा!

नवी दिल्ली | मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा दिला आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा अतंरिम आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा अंतरिम आदेश देणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं. उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला चार आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे दहा आठवड्यांचा वेळ मागितला आहे.

मराठा आरक्षण संदर्भात कागदपत्रांचं वेळेत भाषांतर करण्याची सूचना सुप्रीम कोर्टाने केली आहे. या प्रकरणी अंतिम सुनावणीला सुप्रीम कोर्टात 17 मार्चपासून सुरूवात होणार आहे. यानंतर पुन्हा सवलत दिली जाणार नाही, असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा निर्णय न्यायालयाने दिलाय- संजय राऊत

-67एकर जमीन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला हस्तांतरित करणार; पंतप्रधानांची मोठी घोषणा

-एनआरसी देशात लागू करायची यांच्यात हिम्मत नाही- उद्धव ठाकरे

-पवारांना हिंदूविरोधी म्हणनाऱ्यांना आव्हाडांनी धरलं धारेवर

-ओवैसीसुद्धा एक दिवस हनुमान चालिसा म्हणताना दिसतील- योगी आदित्यनाथ