मुंबई : हर्षवर्धन पाटील यांच्या आरोपात फारसं तथ्य नाही. भांडण झालं दिरासोबत आणि नवऱ्याला सोडून दिलं असं हर्षवर्धन पाटील यांचं झालंय, असा खोचक टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटलांना लगावला.
हर्षवर्धन पाटलांचं भांडण राष्ट्रवादी काँग्रेसशी होतं मग त्यांनी काँग्रेस सोडण्याची गरज नव्हती. दिर कायतरी बोलला म्हणून आपण नवरा नाही सोडत, अशी बोचरी टीका सुप्रिया सुळेंनी हर्षवर्धन पाटलांवर केली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये इंदापूरच्या जागेची चर्चा झालीच नव्हती. सीटींग असेल तर चर्चा तर झालीच पाहिजे ना, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी हर्षवर्धन पाटलांनी पक्षांतर करताना केलेल्या आरोपावर भाष्य केलं आहे.
इंदापूरच्या जागेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. हर्षवर्धन पाटलांनी चर्चा केल्याशिवाय पक्ष कसा काय सोडला, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.
भाजपमध्ये जायचं हे त्यांचं आधीच ठरलं होतं. आता त्याची पावती हर्षवर्धन पाटील आमच्या नावाने फाडत आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
“5 वर्ष हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाकडे डोळे लावून होतो… आज अखेर पक्षप्रवेश झाला” https://t.co/s9XCxJhFyJ @Dev_Fadnavis @Harshvardhanji
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 11, 2019
पावती आमच्या नावावर फाडू नका, त्यानंतर 50-55 फोन केले; अजित पवार भडकले – https://t.co/grDqPdEDdA @AjitPawarSpeaks @Harshvardhanji
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 11, 2019
सगळं काही बदलता येतं पण ‘शेजारी’ नाही; हर्षवर्धन पाटलांचा अजित पवारांवर निशाणा https://t.co/cV6VAPJsoU @Harshvardhanji @AjitPawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 11, 2019