“नाटक, नाटक असतं तीन तास जायचं, आनंद घ्यायचा आणि घरी जायचं…”

मुंबई | मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत राज्यातील सर्व मशिदीवरील भोंगे उतरले नाही तर मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तसेच राज ठाकरेंची आज औरंगाबादमध्ये होणारी सभा वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

अल्टीमेटम असं काही नसतं, राज ठाकरे यांच्या सभेला माझ्या शुभेच्छा असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या.

अल्टिमेटम वैगरे शब्द मी ज्या संस्कृतीत लहानाची मोठी झाले त्यात बसत नाही. यशवंतराव चव्हाण यांनी हा शब्दच कधी वापरला नव्हता. त्यामुळे मला फारसा त्या शब्दाचा अर्थ समजत नाही, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

इंग्रजीत डिक्शनरीत काहीतरी आहे त्याचा अर्थ. पण, मला असं वाटतं की या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांचं अतिशय सक्षम असं सरकार आहे, जे चांगलं काम करतय. हे केवळ मीच म्हणत नाही तर केंद्र सरकारची आकडेवारी देखील हेच सांगते आहे, असंही त्या म्हणाल्यात.

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सभेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करणार आहेत. मात्र ही सभा म्हणजे केवळ ड्रामा म्हणजेच नाटक असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तीन तासांचं नाटक ‘एन्जॉय’ करायचं आणि विसरून जायचं अशी टीका देखील सुप्रिया सुळेंनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरेच समजू लागलेत” 

“…तेव्हापासून राज माझ्या मागावर होते”, शर्मिला ठाकरेंंनी सांगितला लग्नाआधीचा किस्सा! 

राज ठाकरेंच्या सभेआधी असुदुद्दीन ओवैसींनी दिला मनसेला सल्ला, म्हणाले…

अमृता फडणवीस म्हणाल्या, “देवेंद्रजींना मी देशासाठी वाहून टाकलंय”

“तिची सगळी मतं मला पटत नाहीत, माझी अपेक्षा असते तिनं राजकीय पोस्ट करु नये”