ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

मुंबई | मराठी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री प्रेमा किरण यांचं मुंबईत निधन झालं आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 61 व्या वर्षी या अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाने मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

अर्धांगी, धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या.

80, 90 च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. दे दणादण, धुमधडाका चित्रपटातील त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

प्रेमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी राजकीय पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचं ठरवल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सांगितलं होतं.

1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धूमधडाका’ या चित्रपटात त्यांनी अंबाक्काची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीसोबतच त्या निर्मितीसुद्धा होत्या. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

“नाटक, नाटक असतं तीन तास जायचं, आनंद घ्यायचा आणि घरी जायचं…” 

“राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरेच समजू लागलेत” 

“…तेव्हापासून राज माझ्या मागावर होते”, शर्मिला ठाकरेंंनी सांगितला लग्नाआधीचा किस्सा! 

राज ठाकरेंच्या सभेआधी असुदुद्दीन ओवैसींनी दिला मनसेला सल्ला, म्हणाले…

अमृता फडणवीस म्हणाल्या, “देवेंद्रजींना मी देशासाठी वाहून टाकलंय”