“खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी मी सज्ज, मात्र डासांचा उच्छाद मला भोवला”

मुंबई | विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आणि सगळेच पक्ष जोमाने प्रचाराला लागले. राष्ट्रवादीही आपल्या उमेदवारांना निवडूण आणण्यासाठी मैदानात उतरली आहे. मात्र या सगळ्या प्रचाराच्या धामधुमीत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे दिसण्याची चिन्ह धुसर आहेत.

सुप्रिया सुळेंना डेंग्यू झाल्याने त्यांना डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

ऐन प्रचाराच्या धामधुमीत सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी मी सज्ज आहे. परंतु डासांचा उच्छाद अखेर भोवला…! मला डेंग्यूची लागण झाली असून डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे, असं सुप्रिया सुळेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंचा नुकताच संवाद दौरा पुर्ण झाला. यात त्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. मात्र त्यांना डेंग्यू झाल्याने आता पुुढचे काही दिवस त्या प्रचारात दिसणार नाहीत. 

दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी त्यांना पाहता येणार नसल्याची खंत त्यांच्या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये बोलून दाखवली आहे.

सुप्रिया सुळे यांची  फेसबुक पोस्ट-


महत्वाच्या बातम्या-