हिम्मत असेल तर माझ्याविरोधात ईडीची नोटीस काढून दाखवा- सुप्रिया सुळे

सोलापूर |  हिम्मत असेल तर सरकारने माझ्याविरोधात ईडीची नोटीस काढून दाखवावी, असं ओपन चॅलेंज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या सोलापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘संवाद ताईंशी’ या खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

देशात आणि राज्यात ईडी आणि सीबीआय चौकशीवरुन राजकीय वातावरण तापलेलं असताना सुप्रिया सुळे सरकारला खुलं आव्हान दिलं आहे.

मी काही केलंच नाही तर सरकार कुठून ईडी आणि सीबीआयची नोटीस पाठवणार? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.

थोडे दिवस ईडी-सीबीआयवाले ताणतील, मात्र शेवटी मीच जिंकणार, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. जरी त्रास झाला तरी पर्वा नाही संघर्ष करायला मजा येते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-