‘पुणेकरांनी शोधलेल्या लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये’; सुप्रिया सुळेंचा मोदींना इशारा

पुणे | गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनावरील लस केव्हा येणार या एकाच गोष्टीवर सर्वांचं लक्ष लागून आहे. याच कोरोना लसीसाठी पुण्यातील सिरम इंस्टीट्युटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार  सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींना सणसणीत टोला लगावला आहे.  पुण्याच्या मावळमधील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या आढावा बैठकीत सुप्रिया सुळे आज बोलत होत्या.

सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या की, तुमच्या इथे 1400 कोटी 1500 कोटींच्या गप्पा चालतात. आमच्या दिल्लीत तर 1 लाख कोटीच्या गप्पा चालत असतात. या सर्व गप्पा कोण मारतं? हे तर तुम्हाला माहीतच आहे. ते आज पुण्यात आले आहेत. बघा ‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नही’.

संपूर्ण जग फिरून झालं पण शेवटी लस सापडली ती आमच्या पुण्यातच. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. नाही तर कोणीतरी म्हणायचे की ही लस आम्ही शोधली आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या कोणीही आमच्या लसीवर दावा करू नये, असा इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला आहे.

तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आता वर्ष पूर्ण झालं आहे.  तरीही सरकार कोसळेल असा पाढाच विरोधकांनी लावला आहे. मात्र, आता पुढची 5 वर्षच नाही 25 वर्ष कधी उलटतील हे देखील कळणार नाही, असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील सुरुवातीपासूनच महाविकास आघाडी सरकारवर कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरून निशाणा साधत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीसह शरद पवारांवर घणाघात केला होता.

जर राज्यात केव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर शरद पवार अजित दादांना नाही तर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सडेतोड उत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील यांची राजकीय उंची नेमकी काय आहे? काहीही कर्तुत्व नसताना उंची नसताना ते बोलत असतात. त्यांनी आधी आपली उंची काय आहे ते पाहावं. ते मोठ मोठ्या नेत्यांबाबत असंच काहीसं बोलून आपली उंची वाढवत असतात, असा पलटवार अनिल देशमुख यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

काय सांगता! महिनाभरात तब्बल इतक्या हजारांनी सोनं उतरलं

शरद पवार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करणार? गृहमंत्री रोखठोक उत्तर देत म्हणाले…

ट्विंकलने न.शेत सलमान सोबत केलं ‘ते’ कृत्य, अक्षय कुमारला समजताच त्याने रागात सलमानला…

राष्ट्रवादीला मोठा धक्का! महाराष्ट्राच्या ‘या’ लोकप्रिय आमदाराचं नि.धन

अर्णव गोस्वामिंच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाची मोठी सुनावणी