काय सांगता! महिनाभरात तब्बल इतक्या हजारांनी सोनं उतरलं

नवी दिल्ली | आपल्यातील अनेकांना सोन्याचे दागिने घालण्याची हौस असते. दिवाळी दसरा म्हटलं की भारतीय स्त्रियांची दागिने खरेदी करण्याची घाई असते. सोन्याची वाढत जाणारी मागणी पाहता अलिकडच्या काळात सोन्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत.

मात्र, सोनं चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आता एक खुशखबर आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर हा महिना सन उत्सवाचा असल्यानं या महिन्यात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता होती. पण कोरोना महामारी आणि कोलमडलेली अर्थव्यवस्था यामुळे सोन्याचे भाव गडगडले आहेत.

नोव्हेंबर महिन्यात सोने 2600 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर उच्चतम स्तरावरून सोने 4000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 30 ऑक्टोबरला सोने 50699 रुपये प्रती 10 ग्रॅमवर गेले होते. हे दर आणखी वाढू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, कोरोना लसी संदर्भात समोर आलेल्या बातम्यांमुळे सोन्या चांदीच्या किंमतीत घट झाली आहे.

या काळात सोन्याबाबत सुरक्षित गुंतवणुकीची मागणी घटली आहे. 27 नोव्हेंबरला हेच सोन्याचे दर 48106 रुपये प्रती 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले होते. अशा प्रकारे या महिन्यात सोने तब्बल 2600 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

दरम्यान, आता मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन वसूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करणार? गृहमंत्री रोखठोक उत्तर देत म्हणाले…

ट्विंकलने न.शेत सलमान सोबत केलं ‘ते’ कृत्य, अक्षय कुमारला समजताच त्याने रागात सलमानला…

राष्ट्रवादीला मोठा धक्का! महाराष्ट्राच्या ‘या’ लोकप्रिय आमदाराचं नि.धन

अर्णव गोस्वामिंच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाची मोठी सुनावणी

‘माझ्यावर वि.षप्रयोग करणारी ती…’; लता मंगेशकर यांचा धक्कादायक आरोप!