अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या शाब्दिक हल्ल्यानंतर सुप्रिया सुळेंचा पलटवार!

पुणे | भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सोलापुरातील सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. अमित शहा यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादीचे युवा नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अमित शहांच्या टीकेचा समाचार घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही शहांवर पलटवार केला आहे.

शरद पवारांनी काय केलं हे बाहेरच्या व्यक्तीने महाराष्ट्रात येऊन सांगायची गरज नाही. शरद पवार काय आहेत, हे महाराष्ट्राला माहीत आहेत, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अमित शहा आणि भाजपवर हल्लाबोल केला.

गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येवून साहेबांचं कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केलं?, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.

समोरच्या पक्षाचं राजकारण नेहमीच डबल ढोल असल्यासारखं वाजत असत. पण आत्ता बास झालं, असं म्हणत भाजपविरोधात रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

महत्वाच्या बातम्या-