छत्रपती शिवराय आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या तानाजी मालुसरेंचा अपमान; सुप्रिया सुळे संतापल्या

दिल्ली| दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आणि तानाजी मालुसरे यांची तुलना गृहमंत्री अमित शहा यांच्याशी करण्यात आली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज तर गृहमंत्री अमित शहा यांना नरवीर तानाजी मालुसरे यांच्या रुपात दाखविले आहे. हा छत्रपती शिवराय आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या तानाजी मालुसरे यांचा अपमान आहे, अशा संतप्त भावना ट्विटरद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाॅलिटिकल किडा या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा तर तानाजी यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच उदयभान राठोड यांच्या चेहऱ्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा चेहरा लावण्यात आला आहे.

या प्रकारामुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विविध माध्यमातून निषेध व्यक्त केला जात आहे. अशातच खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून संतापजनक भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-“शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प का बसलेत??”