खासदार सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअ‌प स्टेटसला फडणवीसांचा फोटो अन् कॅप्शनमध्ये म्हणाल्या…

मुंबई |  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खसदार सुप्रिया सुळेचं व्हॉट्सअ‌ॅप स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सुप्रिया सुळेंनी व्हॉटसअ‌ॅप स्टेटसला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसोबतचा फोटो ठेवला आहे.

फडणवीसांच्या पाठीवर हात ठेऊन झालेल्या हास्यविनोदाला सुप्रिया सुळेंनी कमेंट केली. लूक हू आय मेट टुडे? असं स्टेटस लिहिलं आहे. सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे बुधवारी विधानभवनात आल्या होत्या.

वळसे पाटील यांची भेट आटोपून त्या परत निघाल्या असता त्यांच्यासमवेत काही इतर महिला पदाधिकारीही होत्या.  तेवढ्यात देवेंद्र फडणवीस यांचे सुरक्षारक्षक महिलांना बाजूला सरा, बाजूला सरा करीत त्यांनी फडणवीस यांना तेथून जाण्यासाठी जागा केली. यावर सुप्रिया सुळेंनी सुरक्षारक्षकांना प्रथम हटकलं.

दरम्यान, उपस्थितांनी हा फोटो काढला होता. मग हा फोटो सुप्रिया सुळेंनी आपल्या व्हॉटसअ‌ॅप स्टेटसला ठेवत त्याखाली लूक हू आय मेट टुडे, असं लिहिलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘उद्धव ठाकरेंना लाज वाटत होती काय?’; नारायण राणेंचं टीकास्त्र

-इंदोरीकरांचा ‘तो’ व्हीडिओ अंनिसच्या हाती; महाराजांच्या अडचणीत वाढ!

-अमृता फडणवीसांना तोंड आवरायला सांगा; शिवसेना नेत्याचं संघाला पत्र

-‘उद्धवच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं’; भाजपची बोचरी टीका

-खासदारकी वाचवण्यासाठी जयसिद्धेश्वरांची धडपड, म्हणतात…