“इंदुरीकर बोलले त्यात चुकीचं काय?; कारवाई केली तर त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू”

बीड | ह.भ.प. इंदुरीकर महाराज देशमुख यांनी जे वक्तव्य केलं आहे ते गुरुचरित्रात आहे. मग ते बोलले त्यात चुकीचं काय आहे, असं म्हणत माजी मंत्री सुरेश धस यांनी महाराजांचं समर्थन केलं आहे. तसेच इंदुरीकरांवर कारवाई केली तर त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असंही ते म्हणाले आहेत.

कुणी काही बोलले म्हणून महाराजांना नोटीस पाठवली असेल तर सरकारच्या अकलीची किव येते, अशी टीकाही धस यांनी केली आहे. इंदुरीकर महाराज जे बोलतात ते आपल्या धर्मग्रंथात लिहिलेलं आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही, असंही ते म्हणाले आहेत.

सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा तर विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, काही जण महाराजांच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत, तर काहींनी महाराजांवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“आपण कुठल्याही पक्षाचे असा…आता आपण सारे जण दिल्लीचे 2 कोटी लोक माझे कुटुंबीय आहात”

-कै.आर.आर.(आबा) पाटलांच्या नावाने सरकार देणार ‘हा’ पुरस्कार!

-“उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याच्या महत्वाकांक्षेसाठी या जनादेशाचा अनादर केला”

-चांगलं काम करुनही एवढा त्रास सहन करावा लागतोय; इंदुरीकरांची पुन्हा उद्वीग्न प्रतिक्रिया

-…म्हणून आज तुम्हाला घरी बसावं लागलं- अजित पवार