चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा; भाजपच्या ‘या’ माजी नेत्याची नरेंद्र मोदींकडे मागणी

नवी दिल्ली | भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झटापट झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी वातावरण चांगलंच तापलं आहे. भारतामध्ये चीनविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या दरम्यान माजी भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मागणी केली आहे.

चीनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीत एका कमाडिंग अधिकाऱ्यासह भारताचे २० जवान शहीद झाले. याचा बदला घेण्यासाठी भारत तिबेटमधील चीनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करेन का?, असा सवाल यशवंत सिन्हा यांनी विचारला आहे.

सिन्हा यांनी यासंदर्भात ट्विट करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे. घरात घुसून मारु ही धमकी फक्त पाकिस्तानसाठी आहे का?, अशा तिखट शब्दात त्यांनी एकप्रकारे मोदींवर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, चीनी सैन्यानं केलेल्या कृतीनं देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशाप्रकारची कृती भारत सहन करणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी बोलताना म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-पुणेकरांनी शिस्त मोडली; महापौरांनी ‘ही’ गोष्ट बंद करण्याची घोषणा केली!

-पोलीस हवालदाराची लेक झाली कलेक्टर; वाचा सातारच्या स्नेहलची थक्क करणारी संघर्षगाथा

-चीनला आर्थिक झटका देण्याची भारताची तयारी; ‘हा’ प्रोजेक्ट रद्द होण्याची शक्यता

-कोकणातल्या नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा, केला मोठा निर्णय जाहीर

-सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानवर होत असलेल्या आरोपांवर सलीम खान म्हणाले…