पुणेकरांनी शिस्त मोडली; महापौरांनी ‘ही’ गोष्ट बंद करण्याची घोषणा केली!

पुणे |  संपूर्ण महाराष्ट्रात अनलॉकिंगला सुरूवात झाल्यानंतर पुण्यात देखील रूग्ण वाढत असले तरी अनलॉकिंगमध्ये अनेक गोष्टींमध्ये शिथीलता देण्यात आली होती. त्यानुसार पुण्यातील 31 उद्याने सुरू करण्यात आले होते. मात्र उद्यानात वाढणारी गर्दी लक्षात घेता आणि नागरिकांकडून होणारं नियमांचं उल्लंघन पाहता ही सगळी उद्याने आता बंद करण्याचा निर्णय पुणे महापालिकने घेतला आहे.

पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून शहरातील सर्व उद्याने पुन्हा बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यातील उद्याने जशी सुरू झाली होती तेव्हापासून पुणेकरांनी उद्यानांमध्ये गर्दी करायला सुरूवात केली आहे. नुसती गर्दी करून पुणेकर थांबले नाहीत. तर मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, उद्यानांमधील कर्मचाऱ्यांशी या ना त्या कारणावरून हुज्जत घालणे असे प्रकार दररोज घडत आहेत हे महापालिकेच्या लक्षात आल्यावर स्वत: महापौरांनी पत्र लिहून उद्याने बंद करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती.

पुणे महापालिकेची उद्याने खुली केल्यास नागरिकांची वर्दळ वाढून उद्यानातील बाके, ओपन जिममधील व्यायाम साहित्याच्या वापरामुळे कोरोना संसर्गाचा धोकाअधिक वाढू शकतो. याच पार्श्वभूमीवर पुणेकरांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं महापौरांनी सांगितलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-पोलीस हवालदाराची लेक झाली कलेक्टर; वाचा सातारच्या स्नेहलची थक्क करणारी संघर्षगाथा

-चीनला आर्थिक झटका देण्याची भारताची तयारी; ‘हा’ प्रोजेक्ट रद्द होण्याची शक्यता

-कोकणातल्या नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा, केला मोठा निर्णय जाहीर

-सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानवर होत असलेल्या आरोपांवर सलीम खान म्हणाले…

-ठाकरे सरकार जातीय आणि धर्मवादी, वाढत्या जातीय हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची टीका