“रामदास कदम बुवाबाजी आणि जादुटोणा करणारे नेते आहेत”

दापोली: राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे बुवाबाजी आणि जादूटोणा करणारे नेते असल्याचा घणाघाती आरोप दापोली मतदार संघातील शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केला आहे.

रामदास कदम आणि सूर्यकांत दळवी हे एकाच पक्षात असले, तरीही त्यांच्यातील वाद काही संपत नाही मात्र सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

रामदास कदम यांनी चारवेळा पक्षाच्या विरोधात काम केलं असून, त्यांनी दापोली मतदारसंघात घुसखोरी करू नये. असा इशाराही सूर्यकांत दळवी यांनी दिला आहे.

रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात घुसखोरी करू नये. ज्या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला त्या मतदार संघातून निवडणूक लढवावी, असं दळवी यांनी म्हटलं आहे.

माझ्या मतदार संघात मी आमदार नसलो तरी चालेल पण या मतदारसंघातला आणि पक्षासाठी त्याच योगदान आहे असा उमेदवार कोणीही चालेल, असंही सूर्यकांत दळवी यांनी म्हटलंय.