‘मी आणि सुशांत एकत्र होतो तोपर्यंत केव्हाच…’; रियाचा ‘तो’ दावा अंकिताने खोडला

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयच्या हाती सोपविला आहे. सीबीआयनं याप्रकरणी आपला तपास सुरु केला आहे. सुशांतप्रकरणी सीबीआय अत्यंत वेगाने तपास करत असून याप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती याप्रकरणी सुरुवातीपासूनच वादाच्या घेऱ्यात सापडली आहे. रिया चक्रवर्तीवर सुशांतप्रकरणी अनेक आरोप करण्यात आले आहेत. आता याप्रकरणी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडेन रियाचा आणखी एक दावा खोडून काढला आहे.

सुशांत सिंह राजपूत 2013 पासून नैराश्यात होता, असा दावा रिया चक्रवर्तीनं केला होता. मात्र, अंकिता लोखंडेनं रियाचा हाच दावा खोटा ठरवला आहे. अंकितानं यासंबंधित एक ट्वीट करत काही माहिती दिली आहे.

सुशांत आणि मी 23 फेब्रुवारी 2016 पर्यंत एकत्र होतो. सुशांत आणि मी एकत्र होतो तोपर्यंत सुशांतला केव्हाच नैराश्याचा त्रास झाला नाही. तसेच सुशांतनं केव्हाच कोणत्या मानसोपचार तज्ञाचं उपचारही घेतले नव्हते, अशी माहिती अंकितानं दिली आहे.

अंकिता लोखंडेनं पुढे रियाच्या आणि सुशांतच्या नात्याविषयीसुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे. रियाला मी ओळखत नाही. त्यामुळे रियाच्या आणि सुशांतच्या नात्याविषयी माझी काहीही हरकत नाही. मात्र, मी आणि सुशांत एकत्र असतानाचे कोणते प्रश्न जर मला विचारले जात असतील तर मी नेहमीच खर बोलेल आणि सत्य सर्वांसमोर आणेल, असंही अंकिता म्हटली आहे.

मी नेहमीच पुरावे आणि सत्याचे बाजूने असेल. मी आत्ताही सुशांतच्या कुटुंबाच्या बाजूने आहे. सुशांतच्या कुटुंबाच्या मते रिया सुशांतच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे. त्यांच्याकडे तसे पुरावे आहेत. म्हणून मी शेवटपर्यंत त्यांच्याबरोबरच असेल, असंही अंकितानं ट्वीटमध्ये स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“…तर पुढील 50 वर्ष कॉंग्रेसला विरोधक म्हणूनच काढावी लागतील”

रियानं अखेर सांगितला त्या ‘एयु’चा अर्थ; आदित्य ठाकरेंविषयी महत्वाचा खुलासा

‘माझ्या ड्रिंकमध्ये ‘तो’ काहीतरी मिसळून मला प्यायला द्यायचा’; बॉलीवूड क्वीन कंगनाचा धक्कादायक खुलासा

सुशांतच्या बाबतीत माझा एकच गुन्हा झाला तो म्हणजे…; रिया चक्रवर्तीनं सोडलं मौन!

सुशांत प्रकरणातील ड्रग डीलर समजला जाणाऱ्या गौरव आर्याचा मोठा खुलासा