सुशांतच्या कुटुंबावर पुन्हा दुखा:चा डोंगर, परिवारातील ‘या’ व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास

मुंबई |  अभिनेता सुशांत राजपूतला मुखाग्नी देण्याची वाईट वेळ त्याच्या वडिलांवर आली. सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. मात्र तो जाऊन 24 तासही उलटत नाहीत तोपर्यंतच सुशांतच्या घरावर पुन्हा एकदा दुखा:चा डोंगर कोसळला आहे. सुशांतच्या वहिनीने काल अखेरचा श्वास घेतला आहे. ‘अमर उजाला’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

सुशांतची वहिनी सुधा देवी यांना सुशांतच्या जाण्याचा जबर धक्का बसला होता, असं सांगितलं जात आहे. सुशांतचा चुलत भाऊ अमरिंदर सिंग यांच्या सुधा या पत्नी होत्या. सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त आल्यानंतर त्या प्रचंड अस्वस्थ होत्या. सोमवारी त्यांचं निधन झालं आहे.

सुशांतच्या जाण्याचा त्यांना एवढा जबर धक्का बसला होता की त्यांनी दोन दिवसांपासून खाणं पिणं सोडलं होतं. यामुळेच त्यांची तब्येत बिघडत चालली होती. अखेर सोमवारी रात्री उशीरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मागील काही दिवसांपासून सुधा या आजारी होत्या. मात्र सुशांतची बातमी कळाल्यानंतर त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्या बेशुद्ध झाल्या. त्यानंतर प्रत्येक तासाला त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला अन् त्यांनी शेवटी अखेरचा श्वास घेतला, असं सुशांतच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं आहे.

अगोदरच सुशांतच्या मृत्येने परिवारावर दुखा:चा आघात झाला होता. सुशांतच्या जाण्याने कुटुंबिय बैचेन होते. त्यातच आता सुधा यांच्या निधनाने राजपूत कुटुंबावर  दुखा:चा डोंगर कोसळलाय.

महत्वाच्या बातम्या-

-महाविकास आघाडीत कुरबूर, शिवसेनेचे सामनातून काँग्रेसला चिमटे

-“शरद पवारांचं आमंत्रण म्हणजे लबाडाघरचं जेवण, जेवल्याशिवाय काही खरं नाही”

-बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर शक्ती कपूर यांचं रोखठोक वक्तव्य

-मुंबईत आढळली कोरोनाची नवी लक्षणं; ‘ही’ लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा!

-उषा नाडकर्णी ढसढसा रडल्या, सुशांतच्या आठवणीने व्याकूळ!