आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, अमित शहा आम्ही तुम्हाला विनंती करतो की…- सुशांतचे नातेवाईक

मुंबई |  प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अवघ्या 34 व्या वर्षी अभिनेता सुशांत सिंग राजपूत हे जग सोडून कायमचा निघून गेला आहे. त्याच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तसंच त्याच्या कुटुंबियांना देखील मोठा बसला आहे. अशातच त्याच्या कुटुंबियांनी सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीबाबत नवी मागणी केली आहे.

महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास नाही. सुशांतच्या मृत्यूचा तपास केंद्रीय संस्थेच्या माध्यमातून करावा, अशी मागणी सुशांतच्या नातेवाईकांनी केली आहे. सुशांत आत्महत्या करणं शक्य नाही. यासंदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सुशांतच्या कुटुंबियांनी केली आहे.

सुशांत अतिशय हुशार होता. त्याचं देशावर मनापासून प्रेम होतं. समाजाविषयी त्याला आस्था होती. त्याचं कामही खूप उत्तम प्रकारे सुरू होतं. पण मग असं काय झालं की सुशांतने इतक्या टोकाचं पाऊलं उचललं? याचा सविस्तर तपास करावा, असं सुशांतच्या मामांनी म्हटलं आहे.

अतिशय हुशार सुस्वभावी आणि हसतमुख अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येने मनोरंजन विश्वाला हादरवून सोडले आहेत. यशाच्या शिखरावर असताना त्याने आयुष्य का संपवले? याची चर्चा सध्या सुरू आहे. अशातच काल रात्री उशीरा त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे.

सुशांतने राहत्या घरात गळफास घेतल्यानंतर त्याचं पोस्ट मार्टम करण्यासाठी त्याची डेथबॉडी कपूर रूग्णालयात आणण्यात आली होती. रात्री उशीरा पोस्ट मार्टची प्रक्रिया पार पडली. या रिपोर्टमध्ये सुशांतने स्वत:च गळफास घेतल्याचं समोर आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सुशांत सिंग राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय लिहिलंय माहितीये…. पाहा-

-‘दोष माझाच आहे मी त्याच्या…’; सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहरची भावूक पोस्ट

-‘सुशांत नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार होता’; कुटुंबातील व्यक्तीचा खुलासा

-फळं आणि भाज्यांद्वारेही पसरु शकतो कोरोना; अशी घ्या काळजी

-भारतीयांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ महिन्यापर्यंत कमी होऊ शकतो कोरोनाचा प्रभाव!