“गुन्हा दाखल करून काही होणार नाही संजय राऊतांना सरळ जेलमध्ये टाका”

मुंबई |  सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरून जोरदार वादंग पाहायला मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या नातवाच्या सीबीआय मागणीवरून त्यांनी त्याला फटकारलं. तर दुसरीकडे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून सुशांत सिंहच्या वडिलांनी म्हणजेच के. के. सिंह यांनी दोन लग्न केल्यामुळे तो नाराज होता, असं लिहिलं होतं. यावर सुशांतच्या कुटुंबियांनी आपली आणि बिहारमधील नेत्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

बिहारमधील नेतेही राज्य सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. अशातच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी संजय राऊत यांच्यावर टीकस्त्र सोडत त्यांना तुरूंगात टाकण्याची मागणी केली आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात पाटण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरसंदर्भात बोलताना चौबे यांनी, गुन्हा दाखल करुन काही होणार नाही त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे, असं म्हटलं आहे.

दरम्यान,   मी एक संवेदनशील व्यक्ती आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आमची काही चूक झाली, तर मी माफी मागायला तयार असल्याचं संजय राऊत यांनी अगोदरच स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

शरद पवारांनी पार्थ पवारांना फटकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीरपणे काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं- निलेश राणे