आत्महत्येनंतर सुशांतचे इन्स्टाग्रामवर वाढले तब्बल ‘इतके’ लाख फॉलोअर्स

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईतल्या वांदे इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर सुशांतच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटकडे नेटकऱ्यांचं सर्वाधिक लक्ष गेलं.

सुशांतच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 90 लाख फॉलोअर्सवरून आता ते 1 कोटी अठरा लाख इतके झाले आहेत. गेल्या काही दिवसांत सुशांतच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये 20 लाखांची वाढ झाली आहे.

सुशांतने त्याच्या आईचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता आणि हीच त्याची अखेरची पोस्ट ठरली. त्याच्या आत्महत्येची माहिती समजल्यानंतर चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून सुशांत सिंह राजपूत घराघरात पोहोचला होता. छोट्या पडदा गाजवल्यानंतर या अभिनेत्याने त्याचा मोर्चा बॉलिवूडकडे वळविला होता. ‘काइ पो चे’ या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

 

-राज्यात १ जुलैपासून….. कृषीमंत्री दादाजी भुसे यांची महत्त्वाची घोषणा

-“लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्यकारभार आजही आम्हाला मार्गदर्शक”