सुशांतच्या आत्महत्येला हेच लोक कारणीभूत आहेत- कंगना रणौत

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्याला श्रद्धांजली वाहिली. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगाना रणौतनं सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांतच्या आत्महत्येला नेपोटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरत त्याच्या आत्महत्येला हेच लोक कारणीभूत असल्याचं कंगानाने म्हटलं आहे.

कंगनानाच्या टीमनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यात ती सांगते, सुशांतच्या जाण्यानं सर्वांना धक्का बसला आहे. पण काही लोकांना त्याच्या आत्महत्येचा वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलाय, असं कंगाना रणौतने म्हटलं आहे.

जो व्यक्ती रँक होल्डर आहे त्याची मानसिक स्थिती कशी बिघडते. त्याच्या मागच्या काही मुलाखती पाहा पोस्ट पाहा ज्यात त्यांनी लोकांना अपील केलं आहे त्याचे सिनेमा पाहण्यासाठी त्यानं हे सुद्धा सांगितलं होतं की माझे सिनेमा पाहा नाही तर मला या इंडस्ट्रीमधून बाहेर काढलं जाईल, असं कंगाना रणौतनं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“आपण झोपतो तेव्हा कोरोना विषाणूही झोपतो”

-“आपलं ते कार्ट अन् दुसऱ्यांचा तो बाब्या बोलणं बंद करा”

-“कोरोना रुग्णांसाठी मुकेश अंबानींचा अँटिलिया टॉवर ताब्यात घ्या”

-भारताला ‘या’ बाबतीत जगातल्या सर्वोच्च तीन देशांच्या क्रमवारीत आणायचंय- राजनाथ सिंग

-गौतम गंभीर म्हणाला, धोनीने मोठी चूक केली, त्याने ही चूक केली नसती तर…