सुशांतसिंग प्रकरणाला मोठं वळण; शरीरात सापडली ‘ही’ अत्यंत धक्कादायक गोष्ट

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणाला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे, त्याच्या मृ.त्यूचं कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही, मात्र या प्रकरणात रोज काही ना काही नवीन खुलासे होत आहेत. आताही असाच एक नवीन खुलासा झाला असून हा आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक खुलासा मानला जात आहे.

सुशांतसिंगच्या व्हि.सेरा रिपोर्टचा तपास एम्सही एक टीम करत आहे, या टीमला सुशांतच्या शरीरात काही केमिकल ट्रेसेस सापडले आहेत. सुशांतच्या मृ.त्यूमागे या केमिकल ट्रेसेसचा काही संबंध आहे का? अशी शंका आता व्यक्त केली जात आहे आणि याचाच तपास एम्सची टीम आणि सीबीआय करत आहे.

एम्सच्या रेकॉर्डनूसार सुशांतच्या शरीरातील काही भागांना सीज करण्यात आलं होतं. यामध्ये सुशांतच्या पोटाचा भाग, छोट्या आतड्यांचा भाग, यकृताचा भाग, पित्ताशय, दोन्ही मूत्रपिंड, 10ML र.क्त आणि टाळूचे काही केस यांचा समावेश आहे.

एम्सच्या टीमनं सुशांतच्या या सीज करण्यात आलेल्या भागांचा व्यवस्थितपणे अभ्यास केला, त्यांना या तपासात सुशांतच्या शरीरात काही केमिकल ट्रेसेस सापडले आहेत. मात्र यामुळेच सुशांतचा मृ.त्यू झाला का? हे अद्याप कळू शकलेलं नाही, याचं उत्तर शोधण्याचं काम सुरु आहे.

सुशांतसिंग प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याची ह.त्या झाल्याचा आ.रोपही करण्यात आला आहे. आता अशाप्रकारे त्याच्या शरीरात केमिकल ट्रेसेस आढळल्यानं आणखी काही प्रश्न निर्माण झाले आहेत. सुशांतच्या शरीरात हे केमिकल ट्रेसेस आले कसे?, हा त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.

खाण्यापिण्याच्या पदार्थांमधून हे केमिकल ट्रेसेस त्याच्या शरीरात गेले असतील ते सुशांतला कोणाकडून दिले गेलेत का?, त्याचा सुशांतच्या शरीरावर काय परिणाम झाला?, असे आणखी काही प्रश्नही उपस्थित झाले आहेत आणि यामुळे सुशांत प्रकरणाला आता नवीन वळण मिळणार असल्याचं मानलं जात आहे.

सुशांतच्या घा.तपात झाल्याची शक्यता त्याच्या मृ.त्यूनंतर उपस्थित केली जात होती. सुशांतची कथित ए.क्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर या प्रकरणी आ.रोप देखील झाले असून बिहार पोलिसांकडे गु.न्हा देखील नोंदवण्यात आला आहे. आता सुशांतच्या शरीरात केमिकल ट्रेसेस सापडल्यानं सुशांतसोबत घा.तपात झाल्याच्या आ.रोपांना बळ मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, एम्सचा तपास अजून संपलेला नाही. या आठवड्यात होणारी मेडिकल बोर्डाची बैठक देखील या कारणामुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे, कारण मेडिकल बोर्डाच्या बैठकीमध्येच सुशांतसिंगचा हा रिपोर्ट सादर करण्यात येणार होता. मात्र तपास करणारी टीम अजून अंतिम निष्कर्षावर पोहोचू शकलेली नाही.

एम्सच्या टीमचा तपास पूर्ण झाल्यानंतर ही टीम आपला रिपोर्ट सीबीआयला सादर करणार आहे, त्यानंतर सीबीआय यासंदर्भात काय निष्कर्ष काढते यावर सारं काही अवलंबून आहे. सीबीआयनं या प्रकरणी तपास हाती घेऊन एक महिना उलटला आहे, मात्र त्यांच्या हाती अद्याप तरी काहीही लागलेलं नाही.

आता सुशांतच्या शरीरात सापडलेल्या केमिकल ट्रेसेस आणि त्यासंदर्भातील एम्सच्या रिपोर्टमुळे सीबीआयला काही मदत होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे. व्हि.सेरा तपासणीसाठी टॉक्सिकॉलॉजी व्यतिरिक्त हिस्टो पॅथोलॉजी व बायोकेमिस्ट्री विभागाचे फॉरेन्सिक एक्स्पर्ट डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली हा तपास करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

परिणीती चोप्रानं ‘या’ कारणामुळं सुशांतसह काम करण्यास नकार दिला होता; अनुराग कश्यपचा मोठा खुलासा

सुशांतच्या मृ.त्यूचं गूढ उकलणार? सीबीआयसोबत एम्सच्या टीमची महत्वपूर्ण बैठक

अनुराग कश्यपवर बला.त्काराचा आ.रोप झाल्यानंतर अनुरागच्या दोन्ही पूर्व पत्नींनी सोडलं मौन म्हणाल्या…

सुशांत ड्र.ग्जचे हेवी डोस का घेवू लागला होता? रियानं केला धक्कादायक खुलासा!

“शेतकऱ्यांना दह.शतवादी म्हणणारी झाशीची राणी शेफारली आहे, कंगनानं आणि भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी”