‘सुशांतचा वापर केवळ प्रसिद्धिसाठी केला’ ‘या’ फोटोंमुळे अंकिता सोशल मीडियावर होतेय ट्रोल

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमी वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असते. ती तिचे व्हायरल होणारे व्हिडीओज, इंन्स्टाग्राम फोटोज, ट्विट यावरुन नेहमीच चर्चेत असते. यातच काही फोटोंमुळे अंकिताला पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

नुकताच अंकितानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अंकितानं काळ्या रंगाची बिकिनी परिधान करुन स्विमिंग पूलमध्ये एक फोटोशूट केलेलं पहायला मिळालं. मात्र तिनं शेअर केलेले हे फोटो अनेक लोकांना आवडले नाही. त्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. “सुशांतच्या नावाखाली तू खूप प्रसिद्धी मिळवलीस. परंतु तरीही तुझ्याकडे काहीच काम नाही. म्हणून तू दिवसभर असे फोटो शेअर करताना दिसतेस.” अशा आशयाचे कॉमेंट्स करुन तिला ट्रोल केलं जात आहे. सुशांतच्या चाहत्यांनीही तिच्यावर टिका केलेली पहायला मिळाली. अंकितानं अद्याप यावर आपली काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

सुशांतच्या आत्मह.त्येनंतर अंकितानं त्याला न्या.य मिळावा यासाठी आवाज उठवला होता. त्याचबरोबर तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांतला न्या.य मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. तिनं सुशांतच्या मृ.त्यूसाठी रिया चक्रवर्तीला जबाबदार ठरवलं होतं. याशिवाय तिनं रियाविषयी अनेक टिका केलेल्या देखील पहायला मिळाल्या.

दरम्यान, अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या कनेक्टमध्ये असते. ती काय करते?, तिचं शेड्युल कसं असतं? या पुढचे अपकमिंग प्रोग्राम काय आहेत? याची माहिती ती आपल्या फॅन्सला सोशल मीडियावरुन माहिती देत असते. अंकिता सोशल मीडियावर तिचा प्रियकर विकी जैन बरोबर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अंकिताचे नुकताच गोवा ट्रीपचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. ती विकी जैन आणि कुटूंबासमवेत ट्रिपला गेलेली पहायला मिळाली. अंकिता लाोकंडे आणि विकी जैन सध्या रिलेशनशिपमध्ये असून ते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अंकिताचे चाहते तिला नेहमी विचारत असतात की विकी जैनसोबत लग्न करणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

काय झालं साराला? हॉस्पिटलमधून व्हिडीओ शेअर करत केला खुलासा, म्हणाली…

मोठी बातमी! 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

बाबो! आज देखील सोन्याच्या दरात वाढ, वाचा किती रूपयांनी महागले सोनं

जाणून घ्या बहुगुणी कोरफडचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

क्या बात! ‘ही’ कंपनी रात्रीच्या वेळी ग्राहकांना देणार मोफत अनलिमिटेड हाय स्पीड इंटरनेट