“इतर स्टार्सप्रमाणे तुझंही करिअर संपवून टाकेन अशी धमकी सुशांतला दिली होती”

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयच्या हाती सोपविलं असून सीबीआय सुशांत प्रकरणी अतिशय वेगानं तपास करत आहे. सुशांत प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होतात. सुशांतचे मित्र, सुशांतचे स्नेही, सुशांतचे कुटुंबीय अनेक लोक सुशांत संबंधित अनेक खुलासे करत आहेत.

चित्रपट निर्माता विवेक अग्नीहोत्रीनं सुशांत संबंधित अतिशय महत्वाचा खुलासा केला आहे. एकदा फार्म हाऊसमध्ये सुशांत सिंह राजपूतचा एका स्टार प्रोटीजशी वाद झाला होता, ज्यानं त्याला लॉंच केलं होतं. यावेळी त्या स्टारचा राग अनावर झाल्यानं त्यानं सुशांतला तुझं करिअर संपवून टाकील जसं बाकी स्टार्सचं संपवलं आहे अशी धमकी दिली होती, अशी माहिती विवेक अग्नीहोत्री यानं ट्वीटरवरून दिली आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी रिया चक्रवर्ती फक्त एक मुखवटा आहे. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार काही मोठ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असंही विवेक अग्नीहोत्रीनं म्हटलं आहे.

विवेक अग्निहोत्रीनं ज्या स्टारचा सुशांत सिंह राजपूतशी वाद झाला होता त्या स्टारच्या नावाचा अद्याप खुलासा केला नाही. मात्र विवेकनं केलेल्या या नवीन खुलाश्यामुळे सीबीआय टीम हा स्टार कोण होता ज्यानं सुशांतला धमकी दिली होती, याचा शोध लावण्याचा प्रयत्न करु शकते.

सीबीआय सध्या सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची चौकशी करत आहे. सुशांत प्रकरणाविषयी चौकशी करताना सीबीआयनं रियाला काही प्रश्न विचारले होते. यावेळी सीबीआयनं विचारलेल्या प्रश्नांवर रियानं आक्षेप घेतला होता. मात्र, तपासाच्या दृष्टीने हा प्रश्न महत्वाचा असल्याचं सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यावेळी रिया आणि सीबीआय टीममध्ये बाचाबाची झाली होती.

दरम्यान, सीबीआयनं विचारलेल्या काही प्रश्नांवर ते माझ खासगी आयुष्य आहे त्यावर मला उत्तर द्यायचं नाही, असं म्हणत रियानं उत्तर देणं टाळलं होतं. या सर्व प्रश्नानंतर रिया आणि सीबीआय टीममध्ये काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता.

महत्वाच्या बातम्या-

दारूप्रमाणे मंदिरातून महसुल मिळाला असता तर…; भाजपची ठाकरे सरकारवर गंभीर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुखर्जींचा आशिर्वाद घेतानाचा फोटो ट्विट करत वाहिली श्रद्धांजली

प्रणव मुखर्जींच्या जाण्याने आपल्या राष्ट्राने एक रत्न गमावला- छत्रपती संभाजीराजे

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन

अंतिम वर्षाच्या परीक्षा केव्हा आणि कशा पद्धतीने होणार?; राज्य सरकारने केलं जाहीर!