“रिया चक्रवर्ती ही फक्त एक मुखवटा असून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे”

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंहच्या प्रकरणात सध्या नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. रोज कोणीना कोणी सुशांत संदर्भात काहीनाकाही माहिती देत आहे. सीबीआयकडे सुशांतचा तपास आल्यापासून सीबीआयही वेगाने तपास करत आहे. अशातच एका चित्रपट निर्मात्याने सुशांतबद्दल एक नवीन खुलासा केला आहे.

चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्री यांनी असा दावा केला आहे की एका स्टारने सुशांतला त्याचं करियर संपवण्याची धमकी दिली असल्याचा गौप्यस्फो.ट केला आहे. त्यामुळे आता पुन्हा सुशांतच्या प्रकरणामध्ये एक नवीन ट्विस्ट आला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

रिया चक्रवर्ती ही फक्त एक मुखवटा असून मुंबई पोलिसांचा महाराष्ट्र सरकार काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोपही विवेक अग्निहोत्री यांनी केला आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी एका फार्महाऊसवर घडलेल्या सुशांतचा किस्सा सांगितला. एका स्टारने सुशांतला त्याचं करियर संपवण्याची धमकी दिली.  पण यात त्यांनी तो स्टार कोण याचा खुलासा मात्र केला नाही. त्यामुळे आता तो स्टार कोण?, असा सवाल उपस्थित झाला आहे.

त्या स्टारने सुशांतला लाँच केलं होतं. फार्महाऊसवर सुशांत आणि त्याच्यात वाद झाल्यावर त्या स्टारने स्वत:वरील नियंत्रण गमवलं आणि त्याने सुशांतला धमकावलं आणि म्हणाला, तुझं करियर संपवणार जसं बाकीच्यांचं संपवलं, असं विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

एकीकडे विरोधी पक्ष राज्यातील सरकारवर आधीच सुशांतच्या प्रकरणात राज्यातील मंत्रिमंडळाची सीबीआय चौकशी करा, असं जाहीरपणे मागणी करत आहे आणि अशातच विवेक अग्निहोत्री या निर्मात्याने असं खळबळजनक ट्विट केल्याने सीबीआयसमोर आता नवीन आव्हान उभं राहिलं आहे.

दरम्यान, सध्या सुशांतचं प्रकरणात अनेक ट्विस्ट आले आहेत यामध्ये सुरूवातीला बलिवूडमधील घराणेशाहीला आणि अभिनेता सलमान खान,  दिग्दर्शक करण जोहर आणि निर्माता एकता कपूर यांच्यावर निशाणा धरला होता. मात्र त्यानंतर सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या वडिलांनी धक्कादायक असे आरोप केले त्यामुळे तेव्हापासून ट्विस्ट आला आणि आत्तापर्यंत अनेक खुलासे होऊ लागले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

दारूप्रमाणे मंदिरातून महसुल मिळाला असता तर…; भाजपची ठाकरे सरकारवर गंभीर टीका

अनलॉक4 मध्ये काय चालू आणि काय बंद?, ठाकरे सरकारची नियमावली पहा एका क्लिकवर!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुखर्जींचा आशिर्वाद घेतानाचा फोटो ट्विट करत वाहिली श्रद्धांजली

प्रणव मुखर्जींच्या जाण्याने आपल्या राष्ट्राने एक रत्न गमावला- छत्रपती संभाजीराजे

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन