नवी दिल्ली | भाजपने नुकतीच केंद्रीय संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीची पुनर्रचना केली आहे. त्यात माजी अध्यक्ष आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना वगळण्यात आले.
त्यावरुन सर्वांच्या भुवया उंचाविल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना गडकरी यांना वगळून स्थान देण्यात आल्याने देशात विविध चर्चांना उधान आले आहे.
या पुनर्रचनेवरुन माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी संसदीय मंडळाच्या नियुक्तीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
संसदीय मंडळातील सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूका होत नसून नरेंद्र मोदी सांगतील आणि ज्यांच्या नावांना मंजुरी देतील त्यांची नियुक्ती केली जाते, असा खळबळजनक खुलासा स्वामींनी केला आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, तत्कालीन जनता पक्ष आणि आताच्या भाजपच्या सुरुवातीच्या काळात संसदीय आणि केंद्रीय मंडळातील सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूका घेतल्या जात होत्या.
परंतु आता त्या निवडणूका होत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंजुरीने प्रत्येक पदासाठी सदस्यांची नियुक्ती केली जाते. आणि त्यांच्या मताप्रमाणे उमेदवार ठरविला जातो, असे स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.
दरम्यान, भाजपच्याच मोठ्या नेत्याने आपल्या पक्षाला घरचा आहेर दिल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. स्वामी हे भाजपचे मोठे नेते आहेत. त्यांच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या –
फडणवीसांसाठी ब्राम्हण महासंघाची भाजपकडे मोठी मागणी
बिल्कीस बानो प्रकरणावर ओवैसी संतापले; म्हणाले, ‘नशीब नथुराम गोडसेला तरी…’
कोकणातून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता
दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर सीबीआयची मोठी कारवाई
“शेतकरी विरुद्ध मोदी सरकार संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता”