खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सभापती भडकले; ‘या’ कृत्यामुळे दिली समज!

नवी दिल्ली | राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत आज सकाळी नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांच्यासह महाराष्ट्रातून शरद पवार, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी, राजीव सातव आणि भागवत कराड यांनी शपथ घेतली.

उदयनराजे भोसले यांनी यावेळी इंग्रजीतून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष केला. यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना चांगलीच समज दिली.

“हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजे यांनी यापुढे दक्षता घ्यावी, ” असे व्यंकय्या नायडू यावेळी म्हणाले.

सध्या कोरोनाचं संकट असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच पालन करत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! पुणेकरांनो सावध व्हा, पुण्याने गाठलेला हा आकडा आहे धक्कादायक!

नालायक पाकिस्तान!; भारत-चीन वादाचा फायदा घेत अशाप्रकारे करतोय कुरापती!

अण्णा हजारे पुन्हा उतरले मैदानात; महाविकास आघाडी सरकारला दिला ‘हा’ इशारा

संतापजनक! 11 महिने अल्पवयीन मुलीसोबत जे केलं ते ऐकून काळजाचा थरकाप होईल!

क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती केलं होतं तरुणाला; त्यानं उचललेल्या पावलानं प्रशासन हादरलं!