मुंबई | काल अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव केला आणि अखेर भारताचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे.
आज भारत आणि सुपर 12 मध्ये पहिल्यांदाच पोहचून इतिहास रचणाऱ्या नामिबियाचा सामना झाला. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली हा शेवटचा टी-ट्वेंटी सामना खेळला गेला. तर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा प्रशिक्षक म्हणून अखेरचा सामना ठरला.
सर्वप्रथम नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नामिबियाची सुरूवात काहीशी चांगली झाली. आक्रमक सुरवात केल्यानंतर नामिबियाचे सलामीवीर झटपट बाद झाले.
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर नामिबियाची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली. 10 षटकात 47 वर 4 अशी अवघड अवस्था नामिबियाची झाली. जडेजा आणि आश्विनच्या फिरकीपुढे नामिबियाचे फलंदाज ढेर झाले.
नामिबियाचा फलंदाज विरीसने फलंदाजी संभाळण्याचा प्रयत्न केले. मात्र, त्याला केवळ 26 धावा करत आल्या. अखेरच्या षटकात ट्रम्पमेनने आक्रमक फटकेबाजी करत केवळ 6 चेंडूत 13 धावा केल्या.
20 षटकात अखेर नामिबियाला केवळ 132 धावा करता आल्या. भारताकडून रविचंद्रन आश्विनने 4 षटकात 20 धावा देत 3 गडी बाद केले. तर जडेजाने देखील 3 फलंदाजांना तंबुत पाठवलं.
नामिबियाने दिलेल्या 133 धावांचं आव्हान पुर्ण करताना भारताची सुरूवात चांगली राहिली. सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहुल यांनी सुरूवातीपासूनच फटकेबाजी सुरू केली.
रोहित शर्मा आणि के एल राहुल या दोघांनी अर्धशतकीय खेळी केली. रोहित शर्मा 56 धावांवर खेळत असताना झटपट सामना संपवण्याच्या नादात बाद झाला. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि के एल राहुल अखेरपर्यंत मैदानात टिकून राहिले आणि सामना जिंकून दिला.
भारताने हा सामना 28 चेंडू शिल्लक राखून आणि 9 गडी राखून जिंकला आहे. मात्र भारत विश्वचषकातून बाहेर पडल्याने आता भारतीय समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण देखील दिसून येतंय.
दरम्यान, या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक केलं. त्याचबरोबर त्याने टी ट्वेंटी विश्वचषकात 3000 धावांचा टप्पा देखी पार केला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित जगातला तिसरा खेळाडू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘देवेंद्रजी सॉरी, तुमचं नाव…’; मोदींसमोर उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना चिमटे
“…त्यामुळे नरेंद्र मोदींना देशाची माफी मागावी”
जळगावात राष्ट्रवादीला खिंडार! खडसेंना धक्का देत गिरीश महाजनांचा मास्टरस्ट्रोक
“देशापेक्षा आयपीएल गरजेची वाटणाऱ्यांबद्दल काय बोलावं”
वाढदिवसाला हारतुरे केक नको, पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करा- मुरलीधर मोहोळ