देश Top news आरोग्य कोरोना

‘…तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा’; कोरोनाच्या नव्या Omicron व्हेरिएंटची लक्षणं आली समोर

corona fight

नवी दिल्ली | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने देशात खळबळ माजली आहे. दक्षिण अफ्रिकेसह 12 देशांमध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिके (South Africa) वरुन कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.

कोरोनाच्या नव्या Omicron व्हेरिएंटची लक्षणं समोर आली आहेत. दक्षिण आफ्रिकेतील एका डॉक्टरने नवीन कोविड प्रकार ओमिक्रॉनची लक्षणे काय आहेत हे उघड केलं आहे.

डॉक्टरांच्या मते, ओमिक्रॉनची काही लक्षणे आहेत जी पूर्णपणे वेगळी आहेत. जरी बाधितांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणे सौम्य असली तरी काही रुग्ण रुग्णालयात दाखल न होताच बरे झाले आहेत.

गेल्या 10 दिवसांत त्यांनी 30 रुग्णांना कोरोना विषाणूच्या नवीन प्रकार, ओमिक्रॉनने संक्रमित पाहिले आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णाला अत्यंत थकवा, घसा खवखवणे, स्नायू दुखणे आणि कोरडा खोकला यासारख्या समस्या असतात. शरीराचे तापमान वाढतं, असं दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशन (सामा) च्या प्रमुख अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितलं.

Omicron व्हेरिएंटची लक्षणं कोरोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षा खूप जास्त वेगळी आहेत. तसेच आतापर्यंत पाहिलेले सर्व रुग्ण लसीकरण केलेले नव्हते, असंही अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितलं आहे.

ओमिक्रॉनची सौम्य लक्षणे होती. मला वाटतं की युरोपमधील मोठ्या संख्येने लोक या प्रकाराने संक्रमित आहेत. आतापर्यंत ओमिक्रॉनची लागण झालेले आढळून आलेले बहुतेक रुग्ण 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अमेरिका, युरोपमधील काही देश, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांग्लादेश, चीन, बोत्सवाना, मॉरिशस, न्यूझिलंड, झिंबाब्वे, हाँगकाँग, सिंगापूर आणि इस्राईलमध्ये हा कोरोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे या देशातून भारतामध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयाच्या वतीने नवी नियमावली तयार करण्यात आली आहे.

नव्या नियमावलीनुसार संबंधित देशातून भारतामध्ये आलेल्या प्रवाशाला त्यांने मागील 14 दिवसांत कुठेकुठे प्रवास केला, त्याचा तपशील सादर करावा लागणार आहे. सोबतच त्याला कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर सबमीट करणे बंधनकारक आहे. तरच संबंधित प्रवाशाला देशात प्रवेश मिळणार आहे.

येत्या एक डिसेंबरपासून नवी नियमावली लागू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या- 

संसदेत प्रश्न विचारा, आम्ही खुल्या चर्चेला तयार, पण…- नरेंद्र मोदी 

अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाल्या… 

“महाराष्ट्राची बदनामी याच पुत्र प्रेम, पब, पार्टी, पेग आणि पेंग्वीनमुळे झाली” 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; राजेश टोपेंनी केंद्राकडे केली ‘ही’ मागणी

खळबळजनक! दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण