ट्वीट केल्याचे पैसे मिळाले का?; तिच्या प्रश्नावर तापसीचं खोचक उत्तर

नवी दिल्ली | बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू कायम चालू घडामोडी आणि सामाजिक मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त करत असते. सध्याचा प्रचंड तापलेला मुद्दा म्हणजे जेएनयू प्रकरण. जेएनयू प्रकरणी तापसीने ट्विटरवरुन आपलं मत व्यक्त केलं आहे. तिने मांडलेल्या मतावरुन सोशल मीडियावर तापसीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. त्यांना तापसीने सडेतोड उत्तर दिलं आहे.

चालू घडामोडी आणि सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर वक्तव्य करणाऱ्या तापसीने अलिकडेच एक ट्विट केलं होतं. त्यावर “अरे आता मला एक आठवलं, तापसी काल तू जे ट्विट केलं होतं त्याचे पैसे तुला मिळाले की नाही? असा खोचक सवाल एका नेटकऱ्याने तापसीला केला. यावर तापसीने भन्नाट उत्तर दिलं.

नाही ताई, माझी विवेकबुद्धी खरेदी करण्यासाठी तुझं वक्तव्य खूप संकुचित मनोवृत्तीचं आहे. मी असे लहानसहान करार करत नाही. याच कारणामुळे मी तो करार रद्द केला. पुढच्या वेळी कोणतंही ट्विट करताना प्रगल्भ विचार कर आणि ट्विट कर, असं सडेतोड उत्तर तापसीने दिलं.

दरम्यान, जेएनयू प्रकरणी केलल्या ट्वीटसाठी तापसीने पैसे घेतल्याचं बोललं जात होतं. तापसी भारतीय आहे की नाही? असा सवालही तिला विचारला गेला.  या सगळ्यावर तापसीने सडेतोड उत्तर दिलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-