स्वसंरक्षणासाठी आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं; एन्काऊंटर प्रकरणाबाबत तेलंगणा पोलिसांचं स्पष्टीकरण

हैदराबाद| आरोपींनी पोलिसांवर हल्ला करण्यासाठी बंदूक हिसकावून घेतली आणि फायरिंग करण्यास सुरुवात केली, त्यामुळं स्वसंरक्षणासाठी गोळीबार करत त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिली आहे. दोन पोलीस कर्मचारी आरोपींनी केलेल्या हल्ल्यादरम्यान जखमी झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

खूप प्रयत्न आणि तपास केल्यानंतर चार आरोपींना अटक करण्यात हैदराबाद पोलिसांना यश मिळाल होतं. 30 तारखेला त्यांना अटक केली,  4 तारखेला आम्हाला आरोपींची कस्टडी मिळाली. यावेळी आम्ही आरोपींनी गुन्हा कसा केला याची चौकशी सुरु केली असता त्यांनी पीडितेचा मोबाइल आणि इतर गोष्टी घटनास्थळी लपवल्या असल्याचं आरोपींनी स्पष्ट केलं.

आरोपींना घेऊन पोलीस घटनास्थळी आले असता आरोपींनी हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेतल्या. आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं, त्यांनी फायरिंग करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनीही गोळीबार केला त्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला, अशी माहिती सज्जनार यांनी दिली .

आरोपींच्या मृतदेहांची डीएनए चाचणी केली जात आहे यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवले जातील असे त्यांनी सांगितले. शस्त्र कायद्यांतर्गतही गुन्ह्याची नोंद झाली आहे असंही यावेळी त्यांनी स्ष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-