Teslaचा भारताला दे धक्का! एलोन मस्कने घेतला हा मोठा निर्णय

मुंबई | जगातली सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला (TESLA) लवकरच भारतात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. टेस्लाने एक वर्षापूर्वी बंगळुरूमध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड म्हणून नोंदणी केली होती.

येत्या काळात टेस्ला लवकरच आपली कार लाँच करणार आहे. मात्र, काही कारणामुळे कार भारतातील लाँचिंग थांबवल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

अशातच आता टेस्लाने भारताला मोठा धक्का दिला आहे. टेस्लाने अधिकृतपणे तुर्की या देशात प्रवेश केला आहे. तुर्कीमध्ये देखील टेस्लाच्या कारची मोठी मागणी पहायला मिळते.

आणखी एका मोठ्या लोकसंख्येच्या बाजारपेठेत टेस्लाने प्रवेश केला असल्याने आता भारतासाठी हा एक मोठा धक्काच असल्याचं मानलं जात आहे.

टेस्लाने नुकतीच केमल गेकर नावाच्या व्यक्तीची तुर्कीच्या व्यवस्थापकीय संचालकरपदावर केली आहे. याबद्दलचा एक रिपोर्ट नुकताच कंपनीने प्रसिद्ध केला आहे.

2021 मध्ये तुर्कीमध्ये सुमारे 4,000 इलेक्ट्रिक कार विकल्या गेल्या होत्या, तर 2020 मध्ये 1,600 इलेक्ट्रिक कार विकल्या गेल्या. त्यामुळे केवळ एका वर्षात टेस्लाची विक्री दुप्पट झाल्याचं पहायला मिळत आहे.

एलोन मस्क यांनी भारत सरकारने टेस्ला कारवरील आयात शुल्क कमी करावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. भारतात कंपनीचं आयात शुल्क कमी झालं तर भारतात कार स्वस्तात मिळू शकते, असं मस्क यांचं म्हणणं होतं.

दरम्यान, मागील काही काळापासून भारतीय बाजारात इलेक्ट्रीक कारची मागणी वाढली आहे. त्यामुळेच भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजार 2026 पर्यंत 47 अब्ज डाॅलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या-

महिंद्रांनी पाळला शब्द, जिप्सी बनवणाऱ्या दत्तात्रय लोहारांच्या दारात उभी केली नवी कोरी बोलेरो

पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी; Google ने घेतला हा मोठा निर्णय 

“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 2024 मध्ये पराभव शक्य, पण…” 

राज्याच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी 

“भाजपनं आपल्या जन्माचा दाखला दाखवावा”; संजय राऊत संतापले