आजपासून दहावी बोर्डाच्या परिक्षेला सुरुवात, विद्यार्थ्यांना दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

मुंबई | दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. आजपासून राज्यात दहावी बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे.

कोरोनाचं सावट कमी झाल्यामुळे तब्बल दोन वर्षांनी दहावीची परिक्षा ऑफलाईन होणार आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना धाकधूक लागून आहे.

राज्यातील एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. तर राज्यातील 21,284 केंद्रांवर परीक्षा होणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांचा विचार करुन वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे. याशिवा त्यांना परिक्षेचा वेळही वाढवून देण्यात आला आहे.

70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास वेळ वाढवून देण्यात आला आहे तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 20 मिनिटं अधिक देण्यात आले आहेत.

विद्यार्थी करोना बाधित झाल्याने किंवा अन्य वैद्यकीय, अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, लेखी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ न शकल्यास 5 एप्रिल ते 22 एप्रिल या कालावधीत परीक्षा घेतली जाणार आहे.

विद्यार्थ्यांनी तासभर आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. जेणेकरून परीक्षा केंद्रांवर अडचण होणार नाही, असा सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता, कोणत्याही गैरप्रकाराला बळी न पडता परीक्षेला सामोरे जावं, असं सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  टेंशन वाढलं! भारतात कोरोनाची चौथी लाट येणार?, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

  फडणवीसांच्या अडचणींत वाढ; नवाब मलिकांच्या मुलीच्या गौप्यस्फोटानं खळबळ

  “हिंमत असेल तर माझ्याशी लढा अन् युक्रेनला…”, Elon Muskचं पुतिनला ओपन चॅलेंज!

Russia Ukraine War: रशियाने दिली भारताला मोठी ऑफर, मोदी सरकारच्या निर्णयावर जगाचं लक्ष लागलं!

‘CBI नाही तर CID चौकशी करणार’, गृहमंत्र्यांच्या घोषणेनंतर भाजपचा सभात्याग