टेंशन वाढलं! भारतात कोरोनाची चौथी लाट येणार?, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

मुंबई | कोरोना महासाथीच्या सावटानं संपूर्ण जगात आपली दहशत माजवली आहे. त्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

कोरोनाचं सावट हळूहळू शिथिल होत चाललं आहे. त्यामुळे सर्व पूर्णपदावर येत आहे. अशातच शास्त्रज्ञांनी भारतात लवकरच कोरोनाची चौथी लाट येईल, असा अंदाज वर्तवला आहे.

आयआयटी कानपुरमधील शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, भारतात 22 जूनपर्यंत कोरोनाची लाट येईल. शास्त्रज्ञांनी याबाबत धक्कादायक इशाराच दिला आहे.

आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांनी कोरोनाबाबत आतापर्यंत जितके अंदाज वर्तवले आहेत त्यातील बहुतांश आकडेवारी खरी ठरल्याचं पहायला मिळालं आहे.

ऑगस्ट 15 ते 31 दरम्यान सर्वाधीक रूग्णवाढ असेल आणि जवळपास चार महिने ही लाट राहिल. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रूग्णांवर किती परिणाम होईल हे लसीकरण आणि बुस्टर डोसवर अवलंबून असेल असंही तज्ज्ञ म्हटलंय.

दरम्यान, कोरोनाला हलक्यात घेऊ नका कारण कोरोना अद्याप पूर्णपणे नष्ट झालेला नाही, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

कोरोना महासाथीच्या रोगानं थैमान घातलं आहे. त्यामुळे चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  फडणवीसांच्या अडचणींत वाढ; नवाब मलिकांच्या मुलीच्या गौप्यस्फोटानं खळबळ

  “हिंमत असेल तर माझ्याशी लढा अन् युक्रेनला…”, Elon Muskचं पुतिनला ओपन चॅलेंज!

Russia Ukraine War: रशियाने दिली भारताला मोठी ऑफर, मोदी सरकारच्या निर्णयावर जगाचं लक्ष लागलं!

‘CBI नाही तर CID चौकशी करणार’, गृहमंत्र्यांच्या घोषणेनंतर भाजपचा सभात्याग

 …अन् भर सभागृहात धनंजय मुंडेंनी थोपटले दंड; पाहा व्हिडीओ