मुंबई | ठाकरे सरकारनं राज्य सराकरी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ केली आहे.
केंद्रानं तीन टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्याता निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता.
राज्य सरकारनंही आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.
21 जुलै 2021 पासून नवा डीए कर्मचाऱ्यांना लागू होणार असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही थेट वाढ होणार आहे.
राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात कॅबिनेटनं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य सरकारनं देखील महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला आहे. त्या प्रमाणं राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए देखील वाढवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा
‘काहीही खाऊ नका, पिऊ नका’; झेलेंस्की यांनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना
“राऊतांनी कायमचंच मौन धारण केलं तर शिवसेनेचं भलं होईल”
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 3 कोटी रुपये