मुंबई | भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात याचिका दाखल करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकिल सतीश उके यांच्या घरी ईडीने छापा टाकला आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलीये.
जिथं भाजपचे मुख्यमंत्री नाहीत तिथं कायदा समान नसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून झुंडशाही आणि अराजकता पसरवत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. ईडीचा वापर पाळलेल्या गंडुसारखा जर कोणी करत असेल तर ते धोकादायक असल्याचं राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात सातत्याने कारवाई केली जात आहे. खरं म्हणजे हा एक गंमतीचा विषय आहे. आता चितेंचा विषय राहिलेला नाही. चिंता करावी असा विषय राहिलेला नाही. तर गंमत करावी आणि गंमत पाहावी असा विषय झालेला आहे, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
आम्ही सुद्धा व्यवस्थित संदर्भात जिथे माहिती द्यायची आहे, तिथे दिली आहे. पण आम्ही दिलेल्या एकाही कागदपत्रावर किंवा पुराव्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी आणि प्रधानमंत्री कार्यालयाने अद्याप कारवाई केलेली नाही. म्हणून तर मी म्हणतो हा गमतीचा विषय आहे, असं राऊत म्हणालेत.
विरोधी पक्षातील नेते म्हणतात कर नाही त्याला डर कशाला किंवा सगळं काही कायद्याने होत आहे. तुम्ही जे केलेलं कृत्य आहे त्याचे आम्ही पुरावे दिले आहेत. त्यावर एजन्सी कारवाया का करत नाही. हा सत्याचा आणि न्यायाचा जो तराजू आहे तो चोर बाजारातील तराजू आहे. पण शेवटी तराजू हा असा सरळ पाहिजे, असं राऊतांनी म्हटलं.
ज्यांनी गुन्हे केले आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला. कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवरती केली.
महत्त्वाच्या बातम्या-
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय!
दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा
‘काहीही खाऊ नका, पिऊ नका’; झेलेंस्की यांनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना
“राऊतांनी कायमचंच मौन धारण केलं तर शिवसेनेचं भलं होईल”
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ