29 नोव्हेंबरला ठाकरे सरकारची अग्नीपरीक्षा, भाजप डाव साधणार?

मुंबई | महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी येत्या 29 नोव्हेंबरला पोटनिवडणूक पार पडत आहे. काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक पार पडत आहे.

गुप्त मतदान पद्धतीने ही निवडणूक पार पडत आहे. त्यामुळे ही निवडणूक जर बिनविरोध झाली नाही तर महाविकास आघाडी सरकारसमोरील आव्हान वाढू शकतं ही निवडणूक जिंकणं हे सरकारसाठी मोठे कसोटीचं असणार आहे.

ही निवडणुक बिनविरोध करायची तर काँग्रेसला मोठी मेहनत करावी लागेल. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना साकडं घालावं लागेल. पण विरोधी पक्ष असलेल्या भाजपलाही हातापाया पडावं लागेल.

जर निवडणुक पार पडलीच आणि काँग्रेसच्या उमेदवाराला कमी मते मिळाली तर महाविकासआघाडीमध्ये सर्वच काही अलबेल नाही. हे सरकार केव्हाही कोसळू शकतो असा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे ही निवडणूक सर्वांसाठीच महत्त्वाची आहे.

सत्तेत असलेल्या महाविकासआघाडी सरकारला सध्यास्थितीत 170 आमदारांचा पाठींबा आहे. दोन वर्षांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत महाविकासआघाडीला 169 मते मिळाली होती. मात्र, आता बराच काळ बदलला आहे. त्यामुळे गुप्तमतदान पद्धतीत आमदार पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतीलच याची शाश्वती नाही.

मतांमध्ये फाटाफू ट झाल्यास महाविकास आघाडी संघटित नाही किं वा सरकार केव्हाही अस्थिर होऊ शकतं, असा संदेश बाहेर जाऊ शकतो. यामुळेच प्रत्यक्ष मतदानाऐवजी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे.

निवडणूक बिनविरोध व्हावी असं जरी सत्ताधाऱ्यांना वाटलं तरी आघाडीच्या मतांमध्ये फाटाफूट होणार असल्यास भाजप ही संधी सोडणार नाही. यामुळेच या पोटनिवडणुकीत भाजपची खेळी महत्त्वाची ठरणार आहे. भाजप काय डाव साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, विधान परिषदेचे सदस्य आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. ते गांधी घराण्याचे निकटवर्तीय व कॉंग्रेसचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जात होते.

रणपिसे हे 1969 पासून काँग्रेसचे सदस्य होते. 1978 साली स्थापन केलेल्या पुणे शहर इंदिरा काँग्रेस पक्षाचे ते संस्थापक सदस्य होते. 1979 ते 85 या काळात ते पुणे महानगरपालिकेची निवडणूक जिंकून नगरसेवक झाले होते.

दरम्यान, रणपिसे हे दलित समाजातील नेते होते. यामुळेच पक्षाने दलित समाजातील नेत्यालाच उमेदवारी द्यावी, अशीही मागणी होत आहे. तसेच पुण्यातील एखाद्या नेत्याला आमदारकी द्यावी, अशीही मागणी केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“मी माझ्या आयुष्यात असा मुख्यमंत्री पाहिला नाही” 

“नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही” 

भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं- नारायण राणे 

हलगर्जीपणा नडणार?, कोरोनाबद्दल नवी माहिती समोर आल्यानं जगाचं टेन्शन वाढलं 

“देशातील जनता मोदी सरकारच्या स्वस्ताईच्या देखाव्याला भुलणार नाही”