एल्गार परिषदेच्या गुन्ह्याचा तपास एसआयटी मार्फत करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू!

मुंबई | ठाकरे सरकारने एक पाऊल मागे घेत भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए)  सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दंगलीस कारणीभूत ठरल्याचा ठपका असलेल्या पुण्यातील एल्गार परिषदेच्या गुन्ह्याचा तपास हा एनआयएकडे गेला असला तरी या गुन्ह्याची चौकशी एसआयटी मार्फत करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू आहेत.

या गुन्ह्याच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्याबाबत राज्याच्या महाधिवक्त्यांकडे कायदेशीर सल्लागार मागितला आहे. तो कायदेशीर सल्लागार मिळताच एसआयटीची स्थापना होईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात बोलताना स्पष्ट केलं आहे.

राज्य सरकारने भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास एनआयए सोपवण्याचा निर्णय घेतल्यावर शरद पवार यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना यामध्ये अडकवलं गेलं आहे, असा संशय पवारांनी अनेक वेळा बोलून दाखवला आहे.

दरम्यान, दंगलीस कारणीभूत ठरल्याचा ठपका असलेल्या पुण्यातील एल्गार परिषदेच्या गुन्ह्याची चौकशी एसआयटी मार्फत करण्याच्या हालचाली म्हणजे ठाकरे सरकारने केंद्र सरकारला शह दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-रामलीला मैदानावर आज आवाज घुमणार, मैं अरविंद केजरीवाल…..शपथ लेता हूँ की

-पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा पसरवली जाणं चुकीचं आणि दुर्दैवी- सुप्रिया सुळे

-मुलींनी प्रेम करु नये हे समाजाने का ठरवावे… त्यांच्या भावनांचं काय??- सुप्रिया सुळे

-भाजप नेत्याने पुष्पहार घातला म्हणून डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचं केलं गंगाजलाने शुद्धीकरण!

-इंदुरीकर महाराज थोडा संयम ठेवा, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत- नितीन बानुगडे पाटील