ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; तब्बल 1 लाख 1 हजार पदांची होणार मेगाभरती

मुंबई | फडणवीस सरकारने राज्यात 72 हजार पदांची मेगाभरती जाहीर केली होती. त्यानंतर ठाकरे सरकारने या जागा भरणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच यात आणखी 29 हजार पदांची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पदांची संख्या 1 लाख 1 हजार इतकी झाली आहे.

दोन लाख रिक्त पदांपैकी 50 टक्के जागा भरण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे. त्यानुसार शासकीय विभागातील रिक्त पदांची माहिती संकलित करण्याते काम सामान्य प्रशासन विभागातर्फे सुरु करण्यात आले आहे.

महापरीक्षा पोर्टल रद्द करण्यात आल्यानंतर महाआयटीच्या नियंत्रणात खासजी एजन्सीद्वारे मेगाभरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. अडीच महिन्यात मेगाभरतीला सुरुवात होणार असून दिवाळीपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

ठाकरे सरकारच्या मेगाभरतीत आरोग्य, शिक्षण, गृह, महसूल, कृषी आणि पशुसंवर्धन विभागातील जागा भरण्यात येणार आहेत. वर्ग- एक आणि वर्ग- दोन अधिकाऱ्यांची भरती एमपीएससी मार्फत केली जाणार आहे, तर वर्ग-तीन आणि वर्ग-चारची भरती खासगी एजन्सीद्वारे करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘बळीराजा नको करू आत्महत्या’ शाळेत मुलाची कविता; शेतकरी बापाची घरी आत्महत्या

-राज्यसभेत पाठवून राष्ट्रवादी करणार ‘या’ बड्या नेत्याचं राजकीय पुनर्वसन

-बच्चू कडूंनी लुटला सर्वसामान्य जनतेसोबत लोकल प्रवासाचा आनंद

-विरोधक सीएएचं राजकारण करून दंगली घडवून आणतायत- अमित शहा

-अखेर केजरीवालांची मंजुरी; कन्हैया कुमारविरुद्ध देशद्रोहाचा चालणार खटला