चक्क चिमणीने केला सापावर हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर आज काल आपण अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर पक्षु-पक्षांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात. तर काही खूपच धक्कादायक असतात.

अनेकदा आपण जंगलातील प्राण्याचे व्हिडीओ पाहतो. त्यात काही हाणामारीचे व्हिडीओ असतात, तर एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतानाचा व्हिडीओ असतो. याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क चिमणीने सापावर हल्ला केला असल्याचं पाहायला मिळतं आहे. चिमणी एका झाडावर बसलेली असते. ती पाहते तर तिला एक लांब एका खडकावर साप पडलेला दिसतो.

त्यानंतर ती  त्याच्या जवळ जाते आणि त्याच्यावर हल्ला करते. परंतू त्या चिमणीने हल्ला करायच्या आताच तो साप तिला त्याच्या जबड्यात धरतो आणि त्या खडकावरून खाली उडी मारतो. हे सगळं अचानक घडलं असल्यामुळे ती चिमणी गोंधळून गेली असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

ती चिमणी आपला जीव वाचवण्यासाठी खूप धडपड करते. मात्र सापासमोर तिचं सगळं बळ कमी पडतं आणि तो साप तिला गिळून टाकतो.

हा व्हायरल व्हिडीओ ‘@almodeeer1975’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला अनेकांनी पाहिलं असून, या व्हिडीओला वेगवेगळ्या कमेंटही येत आहेत.


महत्वाच्या बातम्या-

कोरोना काळात वास न येणं आणि तोंडाची चव जाणं चांगलं लक्षण,…

तीन दिवसांसाठी संपूर्ण जग अंधारात लोटलं जाईल; टाईम…

कोरोनाचे नियम मोडल्यानं कुत्र्यालाही अटक

लस घेण्यासाठी आलेल्या मुलीनं असं काही केलं की, डाॅक्टर…

कोरोना काळात गरीबांसाठी मदत; ‘ही’ अभिनेत्री…