“लाथ मारायची आणि नंतर सॉरी म्हणायचं अशी त्यांची वृत्ती…”

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलेचं तापलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला अल्टीमेटम दिला होता. या पार्श्वभूमीवरून राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली  होती.

सर्वपक्षीय बैठकीला भाजपने अनुपस्थिती दर्शविली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.

त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका केली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भात राज्यपाल ठरवत असतात. आम्ही कुठलीही मागणी लावून धरली नाही, असं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

पोलीस स्टेशनसमोर आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला होतो. फुटेज तपासल्यानंतर पोलीस या निष्कर्षांपर्यंत आले आहेत की, हे पोलिसांच्या समोर झालं आहे, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

सर्वपक्षीय बैठकीला आम्ही जाणार नाही. सर्वांनी बसून चर्चा करू, निर्णय घेऊ, असं वातावरण राहिलेलं नाही. लाथ मारायची आणि सॉरी म्हणायचं, अशी वृत्ती महाविकास आघाडी सरकारची आहे, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केलीये.

तीन दिवस सलग नेत्यांच्या गाड्यांवर दगड फेकायची आणि मग म्हणायचं एकत्र बसून चर्चा करू. त्यांना जे काही करायचं असेल ते करू दे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

भाजप लोकांमध्ये प्रबोधन करत आहे. पोलखोल सभा सुरू आहेत. त्याचा शेवट विक्रमी होईल की, महाविकास आघाडी पाहत राहिल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, तुम्हीच राष्ट्रपती राजवटीची स्थिती निर्माण करत आहात. एकत्रित बसण्यामध्ये सिरीयसनेस दिसला पाहिजे. या राज्यात पन्नास वर्षे राजकारण केलं. ज्यांच्या शब्दाला वजन आहे, ते येणार नाहीत. कोण येणार तर दिलीप वळसे पाटील, त्यांना मुंबईत निर्णय घेण्याचा अधिकार आहे का?, असा खोचक सवाल चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा सेक्स व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ!

भाजपची सर्वात मोठी घोषणा, 26 मे ला देशभर… 

मोठी बातमी! किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेत्याला अटक

…तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ येईल- नितीन गडकरी 

प्रशांत किशोर यांच्या ‘त्या’ प्रस्तावानंतर सोनिया गांधींनी उचललं मोठं पाऊल!