मुंबई | लवकरच मला जाहीर सभा घ्यायचीय, त्या सभेत मला तकलादू नवहिंदुत्वाद्यांचा समाचार घ्यायचाय. त्यांचा एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावयचाय. मास्क काढून त्यांचा मला समाचार घ्यायचाय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पहिल्या बेस्टच्या एनसीएमसी कार्डचं लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्या जोरदार समाचार घेतला आहे.
आमच्या घरीच हनुमान चालिसा म्हणायची होती, तर चांगल्या भाषेत सांगायला हवं होतं. निरोप धाडायला हवा होता, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
दरम्यान, आमचं हिंदुत्व गदाधारी आहे, हे लक्षात ठेवा, असा इशारही उद्धव ठाकरे यांनी राणा दाम्पत्याला दिला यावेळी बोलताना दिला आहे.
दादागिरी करुन याल तर आम्ही तुमची दादागिरी मोडून काढू, ती कशी मोडायची, हे आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं आहे, असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठणाचा हट्ट धरणाऱ्या राणा दाम्पत्याला उद्धव ठाकरेंनी चांगलंच सुनावलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“लाथ मारायची आणि नंतर सॉरी म्हणायचं अशी त्यांची वृत्ती…”
मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा सेक्स व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ!
भाजपची सर्वात मोठी घोषणा, 26 मे ला देशभर…
मोठी बातमी! किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेत्याला अटक
…तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ येईल- नितीन गडकरी